२३ मार्च २०२३

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. राज्याचे युवा धोरण - २०१२ मधील शिफारशीच्या अनुषंगाने शासनाने जिल्हास्तरावर युवा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

            युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, समाजातील दुर्बल घटक,  अनुसुचित जाती, जमाती व जनजाती आदिवासी भाग इत्यादी बाबतचे कार्य, शिक्षण, प्रौढशिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, व्यवनमुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य, नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या इ. बाबत पुरस्कार वर्षापासून गत तीन वर्षात केलेली कामगिरी या पुरस्कारांसाठी विचारात घेतली जाईल. केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफीती व फोटो इत्यादी.

            जिल्हास्तरावर एक युवक व एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना पुरस्कार देण्यात येईल. सदरचा  पुरस्कार गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रु.१०,०००/- (प्रति युवक व युवतीसाठी) व
गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रु.५०,०००/- (एका संस्थेसाठी ) अशा स्वरुपाचा असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा अथवा पात्र नोंदणीकृत संस्थांनी आपले अर्ज विहीत नमुन्यात भरुन योग्य कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत सादर करावा. विहीत मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, तसेच या कार्यालयाकडून प्रस्तावासह जोडवयाच्या कागदपत्रांची माहिती,  व अधिक माहितीसाठी www.dsosindhudurg.blogspot.in किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग मुख्य प्रशासकीय इमारत सिंधुदुर्गनगरी येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

विहीत नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.          

जिल्हा युवा पुरस्कार (वैयक्तिक)

जिल्हा युवा पुरस्कार (संस्था)


१२ ऑक्टोबर २०२२

राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर प्रशिक्षण शिबिर 2022-23

 

राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. याच भूमिकेतून राज्याचे क्रीडा धोरण २०१२ घोषित करण्यात आलेले आहे. या क्रीडा धोरणातील मुद्दा क. ६ (५) नुसार खेळामधिल बदलेले अधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पध्दती, नवीन खेळ, खेळांची शास्त्रोक्त माहिती वेळोवेळी शिक्षकांना होणे आवश्यक आहे. तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानात भर पडावी व वेळोवेळी क्रीडा क्षेत्रात होणारे बदल अवगत होण्यासाठी राज्यातील शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना योग्य क्रीडा प्रशिक्षण मिळण्यासाठी क्रीडा शिक्षकांचे अद्यायावत प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. यासाठी अद्यावत क्रीडा धोरण सन २०१२ तयार करण्यात येऊन त्याच्या अंमलबजावणी साठी दि. 28/०4/२०१4 चा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

            सन २०१८-१९ ते २०२१-२२ या वर्षात काही तांत्रिक अडचणी व कोविड १९ प्रादुर्भाव यामुळे क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण शिविर कार्यक्रम झालेले नाहीत. सन २०२२-२३ या वर्षात राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार असून त्याकरिता जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित उच्च माध्यमिक, माध्यमिक व प्राथमिक शाळा, आश्रमशाळांमधील क्रीडा विषयक अर्हता धारण करणा-या व किमान 10 वर्षे सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  

            इच्छूकांनी आपल्या आवश्यक कागदपत्रांच्या प्रतींसह विहीत नमुन्यातील अर्ज या कार्यालयाकडे दि. 20 ऑक्टोबरपूर्वी सादर करावेत. सदर अर्ज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ब्लॉग dsosindhudurg.blogspot.in या ब्लॉगवर तसेच कार्यालयात उपलब्ध आहे.

२० जून २०१९

आंतरराष्ट्रीय योगदिन


संयुक्त राष्ट्रसंघाने “21 जूनहा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून घोषित केलेला आहे.
5000 र्षाहून अधिक परंपरा असणारी योग विद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. व्यक्तीच्या
शारिरीक आणि त्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभूत आहे. पाचव्या जागतिक योगा दिनाचे आयोजन दि21 जून 2019 रोजी सर्वत्र करण्यात येणार आहे.
            सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, आयुष विभाग, स्काऊट गाईडस व क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हास्तरावर तसेच तालुकानिहाय विविध ठिकाणी योगदिन साजरा करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याचा मुख्य कार्यक्रम जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्गनगरी येथे दि. 21 जून, 2019 रोजी स. 7.30 ते 8.30 या वेळेत होणार असून सदर कार्यक्रमात डॉ. सुविनय दामले हे योगाभ्यासाचे प्रशिक्षण देणार आहेत.
            तालुकानिहाय योग प्रशिक्षणाचे आयोजन दोडामार्ग हायस्कुल ता. दोडामार्ग, साई मंगल कार्यालय व तालुका क्रीडा संकुल वेंगुर्ला, कुडाळ हायस्कुल, कुडाळ टोपीवाला हायस्कुल मालवण, विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली श्री माधवराव पवार विद्यालय, कोकीसरे वैभववाडी शेठ म.ग. हायस्कुल देवगड याप्रमाणे करण्यात आले आहे.
            जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांनी आपापल्या शाळा. महाविद्यालयांमध्ये व्यापक प्रमाणात योगदिनाचे आयोजन करुन सर्व विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षणामध्ये सहभागी करुन घ्यावे व योगदिन साजरा करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विहीत नमुन्यात शिक्षण व क्रीडा विभागाकडे सादर करावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. किरण बोरवडेकर यांनी केले आहे.
Common Yoga Protocol साठी येथे क्लिक करावे.


विविध योजनांकरिता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


व्यायामशाळा विकास अनुदान-
                तरुण पिढीमध्ये व्यायामाची आवड निर्माण करुन शरीर सुदृढ निरोगी करण्यसाठी या योजने अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था व शैक्षणिक संस्थाना व्यायामशाळांच्या बांधकामासाठी अनुदान देण्यात येते. ज्यामध्ये व्यायामगृह, स्वच्छतागृह, भांडारगृह, कार्यालय इत्यादी सुविधांची उभारणी करण्यात येते. व्यायामशाळा बांधकाम या बाबींसाठी जास्तीत जास्त रु.7.00 लक्ष इतके अनुदान देण्यात येते. नोंदणीकृत पात्र व्यायामसंस्थांना नविन आधुनिक व्यायाम साहित्य खरेदी करण्यासाठीही या योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येते. व्यायाम साहित्य खरेदीसाठी पात्र संस्थांना जास्तीत जास्त रु.7.00 लक्ष   इतके अनुदान देण्यात येते.  यामध्ये संबधित संस्थेने 25 %  अथवा जादा येणारा खर्च  स्व हिश्यातुन करणे अपेक्षित आहे. स्थानिक स्वराज्य संस्था शासकिय कार्यालये यांना स्व हिश्यातुन खर्च करण्याची आवश्यकता नाही.

क्रीडागंण विकास अनुदान-
                राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना त्यांचे क्रीडा कौशल्य वाढविण्यासाठी क्रीडा विकासात संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सुयोग्य क्रीडांगणाच्या मूलभूत सुविधा मोठया प्रमाणात निर्माण व्हाव्यात हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत पात्र संस्थांना क्रीडागंणे विकसीत करण्यासाठी विविध बाबीकरिता अनुदान देण्यात येते. ज्यामध्ये 200 मी अथवा 400 मीटरचा धावनमार्ग तयार  करणे, क्रीडांगणास कुंपण घालणे, विविध खेळांची प्रमाणित मैदाने तयार करणे, क्रीडांगणावर प्रसाधनगृह बांधणे, पाण्याची सुविधा निर्माण करणे भांडारगृह बांधणे, क्रीडांगणावर फ्लड लाईटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणावर मातीचा / सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी/आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरी/आसन व्यवस्थेवर शेड तयार करणे, क्रीडागंणाभोवती ड्रेनेज व्यवस्था करणे,‍ निर्मित सुविधा विचारात घेवून मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा बसविणे मैदानावर रोलींग करण्यासाठी मिनी रोलर खरेदी करणे, या बाबींचा समावेश आहे. यामध्ये संबधित संस्थेने 25 %  अथवा जादा येणारा खर्च स्व हिश्यातुन करणे अपेक्षित आहे.

समाजसेवा शिबीर आयोजन-
                युवक व युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांव्दारे त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास करणे व युवा शक्ती ही राष्ट्र शक्ती प्रबळ करण्यासाठी विविध कार्यक्रमाच्या/प्रशिक्षण/चर्चासत्रांचे आयोजनाव्दारे युवक नेतृत्वांचा विकास करणे हा योजनेचा उद्देश आहे. राज्यातील युवा विकासाच्या दृष्टीकोनातून कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थाना युवक विकासाच्या निगडीत असलेल्या उपक्रमांसाठी अनुदान मंजूर करण्यात येते. उदा. युवकयुवतींचे स्वंयरोजगाराचे प्रशिक्षण देणे, व्यवसाय मार्गदर्शन करणे, बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांना तंत्रशुध्द प्रशिक्षणाचे आयोजन करणे इत्यादी. या योजनेअंतर्गत अनुदानासाठी इच्छुक संस्था किमान एक वर्ष् या क्षेत्रात कार्यरत असणे आवश्यक आहे. तसेच संस्थेकडे युवक कल्याण विषयक उपक्रम राबविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत पात्र संस्थांना जास्तीत जास्त रु.25,000/- इतके अनुदान देण्यात येते. यामध्ये संबधित संस्थेने 50 %  अथवा जादा येणारा खर्च स्व हिश्यातुन करणे अपेक्षित आहे.
                या योजनांतर्गत अनुदान मिळण्याकरिता इच्छुक संस्थांनी संपुर्ण माहिती भरलेल्या विहीत नमुन्यातील अर्जासह परिपुर्ण प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर करावे. पात्र संस्थांना योजनांतून अनुदान देण्यात येईल . विहीत नमुन्यातील अर्ज व अधिक माहिती करिता या कार्यालयाचा ब्लॉग dsosindhudurg.blogspot.in पहावा अथवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.किरण बोरवडेकर यांनी केले आहे.


युवा पुरस्कार


                           जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्गच्‍या वतीने जिल्‍हास्‍तरावर जिल्‍हा युवा पुरस्‍कारांचे वितरण करण्‍यात येणार आहे. राज्‍याचे युवा धोरण -2012 मधील शिफारशीच्‍या अनुषंगाने शासनाने राज्‍य व जिल्‍हास्‍तरावर युवा पुरस्‍कार देण्‍याचा निर्णय घेतलेला आहे.
                              युवा अथवा नोंदणीकृत संस्‍थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्यसमाजातील दुर्बल घटकअनुसुचित जातीजमाती व      जनजाती   आदिवासी भाग कार्य,  शिक्षण,  प्रौढशिक्षण,     रोजगार,    आरोग्‍य,    पर्यावरण,
 सांस्‍कृतिककलाक्रीडामनोरंजनविज्ञान,  तंत्रज्ञान,  व्‍यवसाय,  महिला सक्षमीकरण,  स्‍त्रीभ्रुणव्‍यवनमुक्‍तीतसेच युवांचा सर्वांगीन विकासासाठी केलेले कार्य   राष्‍ट्रीय एकात्‍मतेस   प्रोत्‍साहन देणारे कार्य,  नागरी गलिच्‍छ   वस्‍ती सुधारणा,  झोपडपट्टी,  
आपत्‍ती व्‍यवस्‍थापन तसेच स्‍थानिक समस्‍या,  महिला सक्षमीकरणसाहस इ.बाबत गत तीन वर्षाची केलेली कार्य कामगिरी या पुरस्‍कारांसाठी विचारात घेतली जाईल. केलेल्‍या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्‍यक राहील. उदा. वृत्‍तपत्र कात्रणेप्रशस्‍तीपत्रेचित्रफीती व फोटो इत्‍यादी. 
                    जिल्‍हास्‍तरावर एक युवक व एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्‍था यांना पुरस्‍कार देण्‍यात येईल. सदरचा पुरस्‍कार गौरवपत्र,  सन्‍मानचिन्‍ह,  रोख रक्‍कम रु.10,000/- (प्रति युवक व युवतीसाठी)एका संस्‍थेसाठी गौरवपत्रसन्‍मानचिन्‍हरोख रक्‍कम रु.50,000/- अशा स्‍वरुपाचा असेल.
                     सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील युवक/युवती अथवा पात्र नोंदणीकृत (5 वर्षे पुर्णसंस्‍थांनी आपले अर्ज विहीत नमुन्‍यात भरुन योग्‍य कागदपत्रांसह परिपुर्ण प्रस्‍ताव जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयास दि.२५ जून २०१९  पर्यंत सादर करावा. विहीत मुदतीनंतर आलेल्‍या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्‍यावी. तसेच या कार्यालयाकडून प्रस्तावासह जोडवयाच्या आवश्यक कागदपत्रांची माहीती विहीत नमुन्‍यातील अर्ज व अधिक माहितीसाठी www.dsosindhudurg.blogspot.in येथे पहावे किंवा 02362-२२८२७० या क्रमांकावर संपर्क साधावा.
                                            
                                                                                                                                  
                                                                                                  (किरण बोरवडेकर)
                                                                                                                                           जिल्हा क्रीडा अधिकारी
                                                                                                                                                      सिंधुदुर्ग



०१ फेब्रुवारी २०१९

राज्यस्तरीय/जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण शिबीर

प्रति, मुख्याध्यापक /प्राचार्य
 सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा
 जि.सिंधुदुर्ग




 H:\pendriveरोहिणी\M-MasterTrainer-२०१८-१९

१३ डिसेंबर २०१८

जिल्हा क्रीडा पुरस्कारांकरीता अर्ज सादर करण्याचे आवाहन

जिल्हास्तर क्रीडा पुरस्कारांकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिवर्षी राज्य शासनाच्यावतीने क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून राज्यातील व जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटु, क्रीडा मार्गदर्शक, व क्रीडा कार्यकर्ते यांच्या कार्याचे व योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने राज्यस्तरावर शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. जिल्हास्तरावर गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारर (एक), गुणवंत क्रीडा कार्यकर्ता (एक) व गुणवंत खेळाडू पुरस्कायर (तीन) असे जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्याकत येतात. या पुरस्काणरांचे स्वकरुप प्रत्येुकी प्रमाणपत्र , स्मृातिचिन्हा व रोख रु.१०,०००/- याप्रमाणे आहे. गेल्या दहा वर्षात सांघिक अथवा वैयक्तिक मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारात नॅशनल स्कुल गेम्स, वरीष्ठ राष्ट्री य अजिंक्यपद स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केलेला खेळाडु इत्यादींना मार्गदर्शन केलेले तसेच राज्य व राष्ट्रीयस्तरावर पदक विजेते खेळाडु तयार केले असतील असे क्रीडा मार्गदर्शक 'क्रीडा मार्गदर्शक' या पुरस्कारासाठी अर्ज सादर करु शकतात. तसेच मागील दहा वर्षात एखाद्या विशिष्टा अधिकृत खेळाच्याज विकासासाठी, प्रचार व प्रसारासाठी, संघटनात्म क इ. प्रकारचे कार्य केलेल्यार व्याक्तिंना गुणवंत क्रीडा संघटक /कार्यकर्ता या पुरस्कारासाठी अर्ज सादर करता येतील. गुणवंत खेळाडु पुरस्काराकरीता मागील पाच वर्षांमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणा-या खेळाडुंना अर्ज सादर करता येतील. परंतु खेळाडूंचे अर्ज त्या खेळाच्या अधिकृत जिल्हाा संघटनेमार्फत शिफारस करुन सादर करणे आवश्यपक राहील. या पुरस्कारासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्याक दि.१६ ऑक्टो बर २०१७ रोजीच्या, शासन निर्णयाचे अवलोकन करावे. त्या नुषंगाने पात्र व इच्छुकांनी विहीत नमुन्यातील आपले अर्ज संपुर्ण तपशीलवार माहितीसह भरुन आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दि.३1 डिसेंबर 2018 पर्यंत सादर करावेत. अर्जाचे नमुने या पोस्टच्या उजव्या बाजूला अर्ज व माहिती या रकान्यामध्ये दिले आहेत.उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. इच्छुकांनी विहीत कालावधीत अर्ज सादर करण्याची दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री किरण बोरवडेकर यांनी केले आहे.

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...